नेपाळमध्ये तरुणाईचे आंदोलन, पंतप्रधान ओलींनी दिला राजीनामा नेपाळमध्ये नुकतेच एक मोठे आंदोलन झाले, ज्यामध्ये हजारो तरुण रस्त्यावर उतरले. सुरुवातीला हे आंदोलन सरकारने सोशल मीडियावर घातलेल्या बंदीच्या विरोधात होते, परंतु लवकरच या आंदोलनाने नेपाळमधील भ्रष्टाचार आणि घराणेशाही विरोधातील असंतोषाचे रूप धारण केले. ही दृश्ये भारताच्या शेजारील देशातील आहेत, जिथे पोलिसांनी जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी बळाचा वापर केला, पण त्यांचा संघर्ष अपयशी ठरला. हे आंदोलन सुरू होण्यामागचे कारण म्हणजे २८ ऑगस्ट २०२५ रोजी नेपाळ सरकारने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना देशाच्या कम्युनिकेशन आणि आयटी मंत्रालयाकडे नोंदणी करण्याचे दिलेले आदेश. सरकारने हे नियम बनावट खाती, खोट्या बातम्या आणि सायबर गुन्हे रोखण्यासाठी आवश्यक असल्याचे सांगितले. या आदेशानुसार, सोशल मीडिया ॲप्सना नेपाळमधील एका स्थानिक अधिकाऱ्याची नियुक्ती करणे बंधनकारक होते, जो चुकीचा मजकूर काढण्यासाठी तक्रार निवारण करू शकेल. नेपाळमध्ये सोशल मीडिया वापरणाऱ्यांची संख्या फक्त तीन कोटींच्या घरात आहे. त्यामुळे इतकी कमी युजर संख्या असलेल्या देशात एक नवीन सिस्टीम ...